ग्रामपंचायत कार्यालय, जवळगा मेसाई

आता जवळगा  ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवा — सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध!

गावाची माहिती

ग्रामपंचायत

जवळगा

स्थापना

०१/०५/१९६०

क्षेत्रफळ

1208. हेक्टर

तालुका

तुळजापूर

जिल्हा

धाराश‍िव

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या

1580

स्त्री

731

पुरुष

850

कुटुंब संख्या

400

शेतकरी संख्या

697

मतदारांची संख्या

1313

लागवडी योग्य क्षेत्र

1124 हेक्टर

बागायत क्षेत्र

833 हेक्टर

स्ट्रीट लाईट पोल

88

अंगणवाडी

03

जिल्हा शाळा

01

आरोग्य केंद्र

पोस्ट ऑफिस

01

तलाठी ऑफिस

01

नळ कनेक्शन

400

सार्वजनिक विहीर

02

सार्वजनिक बोअर

03

सार्वजनिक पाण्याची आड

01

महिला बचत गट

18

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

110

दृष्टीकोन

ग्रामपंचायत जवळगा (मे) गाव हे धाराश‍िव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक सुंदर, हिरवेगार आणि संस्कृतीसमृद्ध गाव आहे.तसेच गावाता मेसाई मंदीर असुन ते गावातील लोकांचे श्रदधास्थान आहे. गावाच्या सभोवताल डोंगर, शेतशिवार आणि निसर्गसंपन्न परिसर असल्याने हे ठिकाण ग्रामीण महाराष्ट्राचं खया अर्थानं दर्शन घडवतं. येथील लोक परिश्रमी, नम्र आणि एकोप्याने राहणारे आहेत. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून ऊस, तांदूळ, मका, आणि भाजीपाला ही पिक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच काही ग्रामस्थ दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगात कार्यरत आहेत.जवळगा(मे) ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राचवले आहेत. "स्वच्छ गाव हरित गाव हे ध्येय साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक सक्रिय सहभाग घेतो. ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रम प्रभावीपणे टाववले जातात, ज्यामुळे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मिशन

ग्रामपंचायत गावातील एकोपा, संस्कृती आणि परंपटा यांचा संगम म्हणजे जवळगा(मे) येथे साजरे होणारे सण, जत्रा आणि धार्मिक कार्यक्रम गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून आणि नवकल्पनांच्या माध्यमातून अस्वलेवाडी ग्रामपंचायत आधुनिक, स्वच्छ आणि आत्मनिर्भर गाव वनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक सक्षमीकरण तसेच कृषी व ग्रामीण विकास यांवर विशेष भर देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून नागरिकांचे जीवनमान उंचावणे आणि गावाला स्वच्छ, सुंदर, समृद्ध व आदर्श ग्राम बनविण्यासाठी सातत्याने कार्य करणे हेच आमचे मिशन आहे.

सरकारी योजना

ग्रामपंचायतजवळगा(मे) मार्फत नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती विकास, पाणीपुरवठा आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांत नागरिकांना मदत मिळते. प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

श्री नामदेव बालिश निकम

उपसरपंच

नाव

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.विनेश शिवाजीराव कांबळे

ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्राथमिक आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या सेवा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पुरवून सर्वांगीण विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करते. गावकऱ्यांच्या गरजा आणि कल्याण हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे.

पाणीपुरवठा सेवा

ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.

कचरा व्यवस्थापन व स्वच्छता

ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.

शिक्षणविषयक सेवा

ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.

स्मशानभूमी व्यवस्थापन

ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.

अग्निशमन सेवा

ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.

वाढदिवस, विवाह, मृत्यू नोंदणी

ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.